Pune : कोविड सेंटरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात ; 12 रुग्ण जखमी

An ambulance accident on its way to Kovid Center; 12 patients injured :पुणे-बंगळुरु महामार्गावर बावधन जवळ हा अपघात घडला

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये रुग्णवाहिकेतील 12 रुग्ण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर बावधन जवळ सोमवारी हा अपघात घडला.

कोथरुडमधील जय भवानीनगर आणि किश्कींदानगर भागातून १२ कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन ही रुग्णवाहिका बालेवाडीतील निकमार या कोविड सेंटरकडे निघाली होती.

त्यावेळी पुणे-बंगळुरु महामार्गावर बावधन हद्दीत चालकाचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटली. या दुर्घटनेत 12  रुग्ण किरकोळ जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील आणि अमोल बालवडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या दोघांनीही दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यास मदत केली. दरम्यान, पोलिसांनीही अपघातस्थळी दाखल झाले.

अपघातानंतर महामार्गावर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.