Pune: कोरोनाबाधित नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत

एमपीसी न्यूज – कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांचा महापालिकेतर्फे शोध घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित व संशयित रुग्णांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढून त्या भागातील पाहणी करण्याबरोबरच तपासणी करण्यासाठी पुणे महापालिकेने स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत केली आहे. 

पुण्याच्या हद्दीत असलेल्या संशयित रुग्णांचे तपासणीअंती अहवाल सकारात्मक आल्यास तो रुग्ण  शहराच्या हद्दीबाहेर राहत असल्यास त्याची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेस लागलीच पाठवून पुढील कार्यवाही करण्याची खबरदारी महापालिकेने घेतली आहे.

डॉ. नायडू हॉस्पिटल, लायगुडे दवाखाना सिंहगड रस्ता आणि सणस मैदान क्रीडा संकुल येथे क्वॉरन्टाईन कक्ष तयार करण्यात आले आहेत.  येथील जैविक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वंतत्र यंत्रणा कार्यान्वित झाली आहे़. या ठिकाणाबरोबरच शहरातील विलगीकरण कक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षा विभागास देण्यात आली आहे. तर, महापालिका हद्दीतील सर्व खासगी आणि शासकीय शाळा, महाविद्यालये आणि व्यवसाय व प्रशिक्षण संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

संबंधित आणखी बातम्या वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.