BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ममता फाउंडेशनच्या अनाथ मुलांनी घेतला वॉटर पार्कचा आनंद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वेदी फार्मचे दीपक निकम यांनी पुण्यातील ममता फाउंडेशनच्या अनाथ मुलांना वॉटर पार्कची सफर घडवून आणली. भर उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना पाण्याचा थंडावा या मुलांना अनुभवता आल्याने सर्व मुले आनंदाने हरखून गेली होती.

उन्हळ्याची सुट्टी लागली की मुलांना गावाकडची आठवण येते. पण, या अनाथ मुलांचे काय? सातारा जिल्यातील सोळशी येथील वेदी फार्मने या अनाथ मुलांना गावाकडची सफर करून दिली. निसर्गाच्या सानिध्यात ममता फाऊंडेशनच्या अनाथ निराधार मुलांनी वेदी फार्म येथे खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.

  • कात्रज येथील ममता फाउंडेशनच्या एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलांना वेदी फॉर्म येथे आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुलांनी रेन डान्स, बैलगाडी, राईट स्विमिंग व भोजनाचा आस्वाद घेतला. 6 ते 18 वयोगटातील मुलांनी भरभरून खेळण्याची मज्जा घेतली.

‘इथे येऊन आम्हाला घरी आल्यासारखे वाटते. येथील सर्वांनी आम्हाला जे प्रेम दिले, ते आम्ही विसरणार नाही’, अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या. ममता फाउंडेशनच्या संस्थापक शिल्पा बुडूक, अमर बुडूक यांनी दीपक निकम यांचे आभार मानले.

HB_POST_END_FTR-A4

.