Pune : मानसशास्त्र आणि अध्यात्म या विषयावर डॉ.आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज- माणुसकीच्या वर्तमानासाठी आणि भविष्यातल्या भल्यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याबाबत एका सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (आय.पी.एच.) मनआरोग्य संस्थेच्या पुणे केंद्रामध्ये ज्येष्ठ मनोविकासतज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत होणार आहे.

माणसाचे मन आणि त्याचा अभ्यास करण्याचे मार्ग आजवर तयार केले आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या शाखेने कधी कला, साहित्य शिक्षणशास्त्राच्या अंगाने आणि गेल्या दोन शतकांमध्ये विविध मानसशास्त्रज्ञांकडून त्यामध्ये आता भर पडली आहे ती मेंदूविज्ञानाच्या क्षेत्रातील विविध प्रयोगांची. मनोविकारांच्या क्षेत्रामध्ये विज्ञान आणि ब्रह्मविद्या एकत्र काम करू लागेल असे भाष्य विनोबांनी केले होते. त्याचा प्रत्यय यावा अशी निरीक्षणे मेंदूविज्ञान नोंदवत आहे.

नेमका काय आहे हा आलेख ? माणुसकीच्या वर्तमानासाठी आणि भविष्यातल्या भल्यासाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो ह्या मांडणीचा ?
अशा प्रश्नांवरील उत्तरांची दिशा शोधणारे एक सादरीकरण ज्येष्ठ मनोविकासतज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी करणार आहेत. हा कार्यक्रम निःशुल्क असून प्रथम नोंदणी आवश्यक असणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (आय.पी.एच.)च्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्थळ- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चवथा बंगला )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.