Pune : आनंद निकेतन हायस्कूलमध्ये शिक्षक-पालकांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – गोरोबा शिक्षण संस्थेचे संत गोरोबा बाल विद्यानिकेतन आणि आंनद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये हळदी-कुंकू व तिळगुळ समारंभ पालकांच्या उपस्थित दुपारी 2 ते 4च्या दरम्यान उत्साहात पार पडला.

याप्रसंगी संस्थेच्या सचिव किरण तावरे, आरती सोनाग्रा, रिटा कंडा, भारती सोनाग्रा, वसुंधरा गोरे, सुमन मर्चंट तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्या महिला भगिनी आदी उपस्थित होत्या. तिळगुळ संभारंभासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटकार्डसुद्धा बनवले होते. या शुभेच्छापञांचे प्रदर्शन भरविण्याची आले होते. याचे उदघाटन किरण तावरे व आरती सोनाग्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

आनंद विद्यानिकेतनच्या प्रांगणात अनेक लेकी, सूना, माहेरवाशीण,सासुरवाशीण, मुले, मुली सर्व शिक्षिका, मातृतुल्य तावरे यांच्या सहवासात आनंदात, उत्साहात कार्यक्रमात व खेळात सहभागी झाल्या. विजेत्या महिला भगिनींना बक्षिसेही देण्यात आली. सर्व पालक, माता-भगिनींना संक्रांतीचे वाण व तिळगुळ वाटप करण्यात आले.

सर्व कार्यक्रमाचे स्पॉन्सर रिटा कंडा, आरती सोनाग्रा, संस्थेच्या सचिव तावरे, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, तंत्र विभाग, सर्व शिक्षक वृंद यांच्या मदतीने पूर्ण झाला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सांस्कृतिक विभागप्रमुख पूनम पवार, उज्ज्वला पाटील, मुक्ता कोरपे, आरती नागरगोजे, बीराजदार तसेच प्राथमिक विभागाच्या ज्योती शिंदे, ज्योती एडके, दाणी व बळीद यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.