New Unlock Guidelines : शहरातील जलतरण तलाव, खुली मैदाने, उद्याने पुन्हा सुरु; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि पुणे शहरातील जलतरण तलाव, खुली मैदाने, उद्याने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. याबाबतचे संबंधित आदेश पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पुणे महापालिका आयुक्त राजेश देशमुख यांनी आज (सोमवारी) पारीत केले.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला. 1 जानेवारी 2022 पासून शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंढ वाढ होत गेली. दरम्यानच्या काळात रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता या दोन्ही शहराच्या महापालिका प्रशासनाने काही निर्बंध लादले, यामध्ये प्रामुख्याने जलतरण तलाव, खुली मैदाने, उद्याने पुन्हा बंद करण्यात आली होती.

दरम्यान खेळाडूंसाठी जलतरण तलाव सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाव, मैदाने पुन्हा खुली करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

आयुक्तांनी आदेशात नेमकं काय म्हटले आहे? ( पुणे, पिंपरी – चिंचवड )

  •  महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणा-या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या सरावासाठीच सुरु राहणार आहेत.
  • इतर कोणाला जलतरण तलावाचा वापर करता येणार नाही.
  • महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने सुद्धा सगळ्यांसाठी सुरू करण्यात आली आहेत.
  • सकाळी 6 ते 9 या वेळेतच उद्याने सुरु राहणार आहेत.
  • महापालिका क्षेत्रातील सर्व खुली मैदानेही सुरु राहणार आहेत.
  • आदेशाप्रमाणे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस आवश्यक आहे.

गेल्या १५ दिवसांतील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अखेर पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरांसाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, कोणी या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंडसंहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुसार कार्यवाहीस पात्र राहिल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.