Pune : आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच आता हिंसेला प्रोत्साहन देतात – स्वामी अग्निवेश

अंनिसतर्फे धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद

एमपीसी न्यूज- दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला जाताना माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून मी वाचलो पण माझ्यासह अनेकांवर दररोज झाले होत आहेत. ही बाब निषेधार्थ आहे. आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे त्यांच्याकडून हिंसेच्या घटनांना प्रोत्साहन मिळत आहे अशा शब्दात स्वामी अग्निवेश आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. पुण्यात साने गुरुजी स्मारक येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेत स्वामी अग्निवेश यांनी व्याख्यान दिले त्यावेळी त्यांनी भाजपवर ही तोफ डागली आहे.

दरम्यान, स्वामी अग्निवेश यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या परिषदेचे आयोजक अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाहेर येत विरोधाचे निवेदन स्वीकारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.