Pune : अँग्लू उर्दू बाईज हायस्कूलतर्फे पुणे कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बाईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे पुणे कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

एम सी ई सोसायटी संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, प्राचार्य परवीन शेख (अँग्लो उर्दू बाईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज‘), रोटेरीयन नूरजहाँ काझी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

सत्कारार्थींमध्ये राजेश सहेरिया, दीपक वैराट, अमृत जुरंगे, सुरेश कांबळे, विनादे धाडे, राजू भिसे, मकदूम, डेव्हीड यांचा समावेश होता. स्वच्छता निरीक्षक शेख यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. अलीकडेच हा कार्यक्रम आझम कॅम्पस असेंब्ली हॉलमध्ये झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.