Pune : ब्लॅकबर्नमधील प्रशिक्षणाचा अनिकेतला फायदाच होईल – टोनी मानब्रे

एमपीसी न्यूज – युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव गुणवान आहे. त्याच्यातील गुणवत्तेला ब्लॅकबर्न अॅकॅडमीतील प्रशिक्षणाने पैलूच पडतील आणि त्याला भविष्याच्या दृष्टिने फायदाच होईल, असे मत ब्लॅकर्न रोव्हर्सचे मुख्य प्रशिक्षक टोनी मावब्रे यांनी येथे व्यक्त केले.

अनिकेत हा इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. तीन महिन्याच्या कालावधीसाठी १८ वर्षीय अनिकेत मार्चमध्येच रोव्हर्स अकादमीत दाखल झाला आहे. त्याच्या खेळाचा विकास होण्याच्या दृष्टिने त्याला यंदाच्या मोसमातील स्वानसीविरुद्ध होणार्या अंतिम सामन्याच्या सरावासाठी निमंत्रित करण्यात आले होतो. मुख्य संघाबरोबर राहण्याचा अनुभव देखिल त्याला खूप काही शिकवून जाईल, असे सांगून मावब्रे म्हणाले, ” विजेतेपदाची लढत खेळणाऱ्या संघातील खेळाडूंबरोबर सराव केल्यामुळे त्याला फायदा होईल. अकादमीतील तो सर्वात युवा खेळाडू असला, तरी त्याचा खेळाचा पाया भक्कम आहे. त्याच्याकडे कमालीची उत्सुकता आणि नवे शिकण्याची वृत्ती आहे. तो कठोर मेहनत तर घेतोच आहे, पण, बरोबरीने खेळाचा आनंदही लुटत आहे.”

  • त्याच्यातील अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीने मावब्रे यांना प्रभावित केले. ते म्हणाले, ” अकादमीतील रोजच्या प्रशिक्षणाने त्याच्यातील फुटबॉलपटू अधिक प्रगल्भ होईल. जेव्हा तो पहिल्यांदी क्लबमध्ये सरावासाठी आला तेव्हाच मला याच्यातील गुणवत्तेची ओळख झाली. तु जर रोज आमच्याकडे प्रशिक्षणासाठी आलास, तर तुला माझ्याकडून त्याला पाहिजे ते देईन असे त्याला सांगितले. यामुळे तो देखिल प्रभावित झाला. व्यावसायिक पातळीवरील प्रशिक्षणाने त्याचा पाया आणखी भक्कम होईल. त्याच्या फुटबॉलमधील कौशल्याची पाळेमुळे इतकी घट्ट होतील की येथील प्रशिक्षण त्याच्या कारकिर्दीला भक्कमपणा देणारे ठरेल.”

एका चांगल्या फुटबॉलपटूची व्याख्या करताना ते म्हणाले,” फुटबॉलची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. चेंडू कसा खेळवायचा आणि पास देताना किती वजन वापरायचे या शिकण्याच्या गोष्टी आहेत. त्याला प्रशिक्षकाच्या भाषेत पायाभरणी म्हणता येईल. मुलभूत पुटबॉल कौशल्य ज्या सर्वेात्तम खेळाडूकडे आहे, ते खेळाडू देखिल अशाच पद्धतीने आपला खेळ उंचावतात. फरत इतकाच असतो की ते या सर्व गोष्टी अगदी नैसर्गिकरित्या करत असतात.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.