Pune : कोल्हापूरचा अनिल चव्हाण 74 किलो माती विभागात ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आजच्या सकाळच्या सत्रात 74 किलो वजनी गटातील माती विभागात अतीतटीची अंतिम फेरी रंगली होती. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मल्ल आपले सर्वस्व पणाला लावून जोशाने लढले. यात कोल्हापूरचा अनिल चव्हाण 74 किलो माती विभागात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

कोल्हापूरच्या अनिल चव्हाणने सोलापूर जिल्ह्याच्या आबासाहेब मदनेला १०-६ गुणांनी हरवत सुवर्णपदक पटकावले. अत्यंत रोमांचक व प्रेक्षणीय लढत देत दोघेही मल्ल पूर्ण ताकदीने लढले. तर सांगलीच्या श्रीकांत निकमने कोल्हापूर शहराच्या प्रवीण पाटीलला ७-६ गुण फरकाने हरवत कांस्य पदक मिळवले.

  • अंतिम निकाल – ७४ किलो माती विभाग
    सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)
    रौप्य – आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा)
    कांस्य- श्रीकांत निकम (सांगली)
  • ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील ७४ किलो माती विभाग लढतीचा एक रोमांचक क्षण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.