Pune : बारा बलुतेदार, हातावरचे पोट असलेल्यांना पॅकेज जाहीर करा : गिरीश बापट

Announce the package to those with twelve balutedars, stomachs on their hands: Girish Bapat

विधानभवन परिसरात निदर्शने

एमपीसी न्यूज – बारा बलुतेदार व हातावर पोट असलेल्यांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीत  आज,शुक्रवारी केली. दरम्यान, या मागण्यांसाठी भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी विधान भवन परिसरात निदर्शने केली.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी खासदार बापट यांनी ही मागणी केली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी अजूनही काही व्यावसायिकांचे व्यवसाय अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच ज्यांना अद्यापही महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही.

पथारीवाले, रिक्षावाले, कुंभार समाज व नाभिक समाजासारख्या बारा बलुतेदारांना महाराष्ट्र शासनाकडून योग्य आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, त्यांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पुण्यातील विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या.

यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, शिवाजीनागर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप या आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.