Pune : दहावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

बारावी 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 आणि दहावी 3 ते 23 मार्च 2020 या कालावधी दरम्यान शाळा/कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२० च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.