Pune: संतापजनक! नव्वदीतल्या आजीला कोरोना चाचणीसाठी उभं केलं रांगेत!

Pune: Annoying! Grandma in the nineties stood in line for the corona test!

एमपीसी न्यूज – एक 90 वर्षांची आजी कोरोना चाचणीसाठी पुण्यातील सणस मैदान येथील कोविड केंद्रावर आली होती, परंतु या आजीला स्वॅब देण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. एका वयोवृद्ध महिलेला दिलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे. 

नाना पेठेत राहणाऱ्या एका तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. खरं तर या कुटुंबातील सदस्य असलेल्या 90 वर्षांच्या आजीची चाचणी घरी येऊन करणे अपेक्षित होते, परंतु यासाठी महापालिकेच्या सर्वेक्षण विभागाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे या आजीला स्वॅब देण्यासाठी सणस मैदान येथील कोविड सेंटरवर नेण्यात आले. तिथे पोहोचल्यानंतर कुटुंबातील एकाने आत जाऊन चौकशी केली असता आजींना रांगेत उभे राहण्याची सूचना देण्यात आली.

खरंतर कोविड केअर सेंटर जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देणे आवश्यक असताना या आजीच्या कुटुंबीयांना मात्र वेगळाच अनुभव आला. तुम्हाला रांगेतच यावे लागेल, तपासणीसाठी दुसऱ्या मजल्यावर जावे लागेल, इथे लिफ्ट नाही, दुसऱ्या मजल्यावर स्ट्रेचर यायला जमणार नाही, जर तुम्हाला तळमजल्यावरच तपासणी करायची असेल तर बिबवेवाडीच्या केंद्रावर जा,  अशी उत्तरे या आधीच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

डॉक्टरांनी दाखवली माणुसकी

दरम्यान, इतर कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचा अनुभव आला असताना प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून आलेला अनुभव मात्र वेगळाच होता. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आजींची आपुलकीने चौकशी करत तपासणीसाठी प्राधान्य दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'878da1263e9029ad',t:'MTcxMzg3Mjk2MC41NTkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();