Pune : युनिक इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज- गोकुळनगर कात्रज येथील युनिक इंग्लिश मेडियम स्कुल व ज्यु. कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

यावेळी ईगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वैश्यक फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे विभागप्रमुख, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे उपस्थित होते. कुर्हाडे यांनी शिक्षणातील विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. इ . १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पूर्व प्राथमिकच्या बालकांनी ‘आई मला खेळायला जायचयं ‘ या गाण्यावर केलेल्या नृत्याचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी पाणी समस्येवर जागरूकता निर्माण करणारे भारुड, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा, भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील विविधता दर्शवणारी नृत्य पालकांचे आकर्षण वेधून घेणारे ठरले. व्यसनांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे सादर केले. देशभक्तीपर, ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक विविधतेवर तसेच मैत्रीवर आधारित नृत्याविष्कारांनी उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.