_MPC_DIR_MPU_III

Pune : सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे लष्कर भागातील कॉन्व्हेंट स्ट्रीटवरील सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भारतीय कबड्डी
संघाचे अध्यक्ष रशीद मौला शेख यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी मुख्याध्यापिका नूतन जाधव, क्रीडा शिक्षक अशफाक शेख, जमीर शेख, जयश्री भक्त, मारिया देठे, सीमा कांबळे, आरती केवटे, सुनील कांबळे आदी उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, डॉजबॉल, लांब उडी, उंच उडी, रिले, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, स्लो सायकलिंग, सिंगल बार व डबल बार आदी खेळ या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये होणार आहेत. हा क्रीडा महोत्सव ७ डिसेंबर पर्यंत असणार आहे .

_MPC_DIR_MPU_II

यावेळी भारतीय कबड्डी संघाचे अध्यक्ष रशीद मौला शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “कबड्डी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुले पुढे येत आहेत. कबबड्डीसाठी कष्ट करणे महत्वाचे आहे. मातीतून कबड्डी आता मॅटवर गेली आहे. कष्ट करण्याची तयारी असल्यास विद्यार्थ्यांना कबड्डीमध्ये संधी आहे” असे ते म्हणाले.

यावेळी सेंट जॉन्स सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नूतन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.