Pune Drugs: कोंढवा येथून अंमली पदार्थासह दोघांना अटक 

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील खडी मशीन चौकात कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) दोन आरोपींना एम.डी.या अंमली पदार्थासह अटक केली आहे.(Pune Drugs) यामध्ये पोलिसांनी 8 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

अन्सारी झामिर अहमद अब्दुल खालीक (वय.43 रा.मुंबई) व सर्फराज इक्बाल मेमन (वय.42 रा.मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोन या पथकातील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके हे कोंढवा परिसरात गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, खडी मशी चौकातील शिवशंभो वडेवाले हॉटेल समोर आरोपी हे अंमली पदार्थ घेऊन थांबले आहेत.

Talegaon Encroachment: तळेगाव येथील शिवाजी चौकातील अतिक्रमणावर कारवाईची मागणी

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील 7 लाख 56 हजार रुपये किंमतीचे 54 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ, 23 हजार रुपयांचे तीन मोबाईल, 40 हजार रुपये रोख असा एकूण 8 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.(Pune Drugs) दोघांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.