Pune : अनुभूती संगीत सभा कार्यक्रमात पुणेकरांनी घेतली लयशास्त्राची अनुभूती

एमपीसी न्यूज  : अनुप जोशी यांची तबला अँड बियाँड संगीत संस्था आणि प्रज्ञा देव यांची निर्विकल्प संगीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, कर्नाटक शाळेच्या (Pune) शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे आयोजित केलेल्या अनुभूती संगीत सभा या तबलावादनाच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी एकल तबला वादनाचा आस्वाद आणि लयशास्त्राची अनुभूती घेतली.

शनिवार 25 मार्चला अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी तीनतालात पेशकार, कायदे, चलन, बंदिशी व रेला वाजवून (Pune) आपल्या उत्तम तयारीची झलक दाखवली. यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक ओजस अढिया यांच्या तडफदार एकल तबला वादनाने लोकांना मंत्रमुग्ध केले व सभेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

Dehuroad : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड, निगडीत कारवाया; लाखोंचा गुटखा जप्त

रविवार 26 मार्चला कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात उस्ताद अल्लारखा यांचे ज्येष्ठ शिष्य अमृत बापट यांच्या एकल तबला वादनाने झाली.(Pune) त्यांनी त्रितालात पंजाब घराण्याच्या पद्धतीने पेशकार व कायदे उलगडून दाखवले व जुन्या पारंपरिक बंदिशींबरोबरच त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी देखील ऐकवल्या. त्यानंतर अनुव्रत चॅटर्जी यांनी फारुखाबाद व लखनऊ घराण्याची शैली त्रितालाच्या माध्यमातून रसिकांसमोर बहारदार रित्या पेश केली.

या दोन दिवसीय कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी, कल्पतरू ठाकरे आणि उपेंद्र सहस्रबुद्धे यांच्या सुमधुर व लयदार नगम्याच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. मंगेश वाघमाऱ्यांनी पूर्ण कार्यक्रमाचे अतिशय समर्पक सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.