Pune : शहरातील प्रकल्प मार्गी लावण्याचे गटनेत्यांचे महापौर-उपमहापौर यांना आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील विविध प्रकल्प पूर्ण करावीत, असे आवाहन महापालिका गटनेत्यांनी महापौर-उपमहापौर यांना केले. शिवसृष्टी, महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, 24 X 7 समान पाणीपुरवठा योजना, उड्डाणपुलाचे काम आदी कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, जाहीरनाम्यात जे प्रकल्प घोषित करण्यात आले होते. ते पूर्ण करण्यासाठी मोहोळ सातत्याने पाठपुरावा करायचे. अपघात विमा योजना, बालगंधर्व पुनर्विकास, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय यासाठी त्यांनी दक्षता घेतली.

स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे म्हणाले, महापौर-उपमहापौरांकडून पुणेकरांच्या खूप अपेक्षा आहेत. विविध विकासकामे मार्गी लावावीत.

विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले, महापौर-उपमहापौर निवडणुकीत महाशिव आघाडी झाल्याने सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो. पुणे शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास गेली आहे. वाहतुकीची समस्या सोडविणे गरजेचे आहे. मोहोळ कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. तुम्ही स्थायी समिती अध्यक्ष असताना मी कारकीर्द बघितली आहे. सत्ता राबविताना विरोधी पक्षांना विचारात घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, मुरलीअण्णा यांच्या सारखे भाग्य खूप कमी लोकांना मिळते. माझ्या वडिलांना मंत्रीपद मिळाले. पण, कोथरूडकरांना महापौर पद कधी मिळणार कि नाही? ही खंत होती. ती आज पूर्ण झाली. आपल्या कारकिर्दीत वेगळ्या कामाचा ठसा उमटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अरविंद शिंदे म्हणाले, तुमची आता मोठी कारकीर्द आहे. स्थायी समितीत केवळ 16 सदस्य होते. आता 162 नगरसेवक सांभाळावे लागणार आहेत. तुम्ही चंपा श्रेष्टीची पूजा घातल्याने यश मिळाले. मी उद्या जेजुरीच गाठतो, आशा शब्दांत चिमटे काढले. मेडिकल कॉलेज आणि शिवसृष्टी प्रकल्प मार्गीच लागावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे.

महापौर-उपमहापौर यांच्या जीवनात आज आनंदाचा क्षण आहे. पुणेकर जनतेची सेवा करण्याचा लाभ तुम्हाला मिळाला. 20 वर्षांपासून आम्ही पक्षात काम करीत आहे. सातत्यपूर्ण काम केल्याने संधी मिळते. सामान्य कार्यकर्त्याला आज काम करण्याची संधी मिळाल्याचे धिरज घाटे यांनी सांगितले.

मोहोळ हे सामान्य कुटुंबातील आहेत. 20 ते 25 वर्षांत अनेक संघर्ष केले. कोथरूडमध्ये संघटन वाढविण्यात मोठे प्रयत्न केल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले.

नगरसेवक प्रवीण चोरबेले म्हणाले, आमचा मित्र महापौर होत असल्याचा आनंद आहे. जाहीरनाम्यात त्यांनी अनेक योजना त्यांनी आणल्या.

नगरसेवक भैय्या जाधव, स्वीकृत सभासद गोपाळ चिंतल यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.