BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पत्र्या मारुती गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे ‘गणेश महालाचा देखावा’

नारायण पेठेतील पत्र्या मारुती गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

एमपीसी न्यूज – नारायण पेठेतील पत्र्या मारुती गणेशोत्सव मंडळ (ट्रस्ट) शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने गणेश महाल हा देखावा साकारला आहे. मंडळाने यंदा देखाव्यावर होणारा खर्च टाळून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत केली आहे.

गणेश महालात नक्षीकाम केलेले खांब, हत्ती, कारंजे बसविण्यात आले आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत अनगळ, खजिनदार विनायक नगरकर,कौस्तुभ निकम, सागर हगवणे,अमित बडवे, जयंत भिडे, विक्रम जोशी, प्रेश मालपुरे, मयुरेश अरगडे, भारत हगवणे यांनी देखावा व कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.

खासदार गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, शैलेश टिळक, नगरसेवक राजेश यनपुरे, हेमंत रासने, अ‍ॅड. गायत्री खडके या मान्यवरांनी गणेशाची आरती केली. गणेश चतुर्थीच्या दिवशी रमणबाग ढोल पथक,वर्चस्व ढोलपथक या पथकांनी तसेच राजकमल बँडने गणेशासमोर वादन केले.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या उपस्थितीत गणपतीची स्थापना झाली. हा गणपती सुरुवातीला नारायण पेठेतील पावसकर वाड्यात बसविला जात असे. नंतर माणकेश्वर विष्णू मंदिरात बसवण्यात येत असे. त्यानंतर गणपतीची पत्र्या मारुती मंदिरात स्थापना होत असे.

मंडळाच्या ७५ व्या वर्षी म्हणजेच साधरण १९७० साली गणपती मांडवात बसविण्यात येऊ लागला. मंडळातर्फे दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच लहान मुलांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement