Pune : मेट्रो मार्गावर 4 एफएसआय देण्यासंदर्भात सल्लागाराची नेमणूक; 9 महिन्यांत द्यावा लागणार अहवाल

एमपीसी न्यूज – मेट्रो मार्गावर 4 एफएसआय देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या विषयाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सल्लागाराला 1 कोटी 19 लाख रुपये देण्यात येणार असून, त्याला 9 महिन्यांत अहवाल द्यावा लागणार आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रो मार्गावर 4 एफएसआय दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे राहणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. पौड रोड, आंनद नगर परिसरात 20 ते 25 वर्षे झालेल्या अनेक इमारती आहेत. काही इमारतींना लिफ्ट नाहीत. त्याची पुनर्विकास होणे गरजेचे आहे. हा सल्लागार एकूण 62 स्टेशनचा अभ्यास करणार आहे. शनिवारवाडा परिसरात 4 एफएसआय देऊन चालणार नाही. त्या ठिकाणी विकासाला मर्यादा आहेत. त्याचप्रकारे प्रभात रस्त्यावरही टोलेगंज इमारती उभारताना अडचण येऊ शकतात.

सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट आशा 2 मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो मार्गाचा आणि ‘पीएमआरडीए’च्या मेट्रो मार्गाचा हा सल्लागार अभ्यास करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या मेट्रो मार्गाचा हा सल्लागार अभ्यास करणार नाही. अर्बन मास ट्रान्सपोर्ट कंपनी लि. असे सल्लागाराचे नाव असून त्याला नागपूर आणि विजयवाडा (हैद्राबाद) टिओडी (TOD) नियमावली तयार करण्याचा अनुभव आहे. ही कंपनी शासन पुरस्कृत आहे.

मेट्रो स्टेशन हद्दीपासून 500 मी. अंतरापर्यंत 2 ते 4 चटई क्षेत्र निर्देशांक प्लॉटचे क्षेत्रानुसार व प्लॉट समोरील रस्त्याचे रुंदी नुसार संबंधितांन मिळणार आहे. Tod झोन मधील रहिवासी तसेच शासकीय आणि निमशासकीय क्षेत्राकारीता पार्किंगमध्ये सवलत मिळणार आहे.

टिओडी (TOD) झोनमध्ये कमीत कमी 25 चौ. मी. व जास्तीत जास्त 120 चौ. मी. कार्पेट क्षेत्राच्या सदनिका करणे अपेक्षित आहे. एकूण चटई क्षेत्र निर्देशांकापैकी 50 टक्के बिल्टअप क्षेत्राच्या सदनिका 60 चौ. मी. अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या असणे बंधनकारक आहे. सामासिक अंतरामध्ये सवालत देण्यात आली आहे. त्याकरिता पुणे महापालिकेमार्फत प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

HB_POST_END_FTR-A2
You might also like