Pune: भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती

Pune: Appointment of Ganesh Bidkar as BJP State Executive Member पुणे महानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणूनही बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातून भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम करण्याची गणेश बिडकर यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, पुणे महानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणूनही बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. 

गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष, माजी अध्यक्ष शहर सुधारणा समिती, माजी सरचिटणीस पुणे शहर भाजपा, पुणे महापालिका पक्षनेते म्हणून काम केले आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत कसबा मतदारसंघात ते प्रबळ इच्छुक होते. तशी तयारीही त्यांनी केली होती. मात्र, अंतिम क्षणाला त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यानंतर भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदासाठी बिडकर प्रबळ दावेदार होते. पण, त्यावेळीही खासदार गिरीश बापट यांच्या राजकारणाचा ते बळी ठरले होते.

2017 च्या महापालिका निवडणुकीतही त्यांचा असाच धक्कादायकरित्या पराभव करण्यात आला. त्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बिडकर यांच्यावर दुहेरी जबाबदारी सोपविली. त्यामुळे त्यांचे भाजपमध्ये वजन वाढल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like