_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : कोरोना केअर सेंटरवर महिला सुरक्षा रक्षक नेमा : राष्ट्रवादीची मागणी

Appointment of Women Security Guards at Corona Care Center: Demand of NCP

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुणेकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवा, तसेच कोरोना केअर सेंटरवर महिला सुरक्षा रक्षक तातडीने नेमण्यात यावेत, अशा अनेक मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे केल्या.

यावेळी खासदार ॲड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, नितीन कदम उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुणे शहरात कोरोना केअर सेंटरवर महिला सुरक्षा रक्षक तातडीने नेमण्यात यावेत.  या कोरोना सेंटरमध्ये चढ्या दराने साहित्य विक्री करून नागरिकांची पिळवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अभय योजना त्वरित लागू करण्यात यावी आदी मागण्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आंबील ओढ्याच्या टेंडर बाबत भयानक गोष्टी ऐकायला मिळत आहे. ठेकेदार किंवा बाहेरचे लोक अधिकाऱ्यांच्या बैठकीत येऊन दर फायनल करीत असतील तर ही बाब निश्चितच पुणे शहराच्या लौकिकाला साजेशी नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

तसेच पाणीपुरवठयात निर्माण केलेला कृत्रिम असमतोल संपुष्टात आणावा, योग्य नियोजन करून संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा करावा.

ज्या भागांत जास्तीचे पाणी जातेय तिथे लक्ष देऊन काटकसर करावी.  पुणे शहराची उपनगरे आणि नवीन समाविष्ट गावांत रोज पुरेशा दाबाने कमीत कमी दोन तास पाणीपुरवठा करावा. मजूर पुरविण्याचे ठेके एका वर्षाचे काढायचे सोडून ते पुढील 3 वर्षांसाठी किंवा 5 वर्षांसाठी काढायचा प्रयत्न होत आहे.

आर्थिक स्थिती नाजूक असताना अशाप्रकारे शहराला आर्थिक गर्तेत ढकलणारे निर्णय घेणे योग्य नाही, अशा अनेक मागण्या राष्ट्रवादीतर्फे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.