Pune : जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या धमार्दाय आयुक्तांनी केलेल्या नेमणुका घटनेनुसार-पोपटराव खोमणे  

        ग्रामस्थांनी आंदोलन मागे घ्यावे 

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून ( Pune ) श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.पण ही निवड धमार्दाय आयुक्त पुणे यांच्या वतीने  घटनेनुसार करण्यात आली आहे.तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व्यक्तींना पसंती देण्यात आली आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच मागील पंधरा दिवसापासून ग्रामस्थांनाकडून सुरू असलेल आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती विश्वस्तांनी केली आहे.

   पत्रकार परिषदेला डॉ. राजेंद्र खेडेकर,अ‍ॅड. विश्वास पानसे,अभिजीत देवकाते,अ‍ॅड. पांडुरंग थोरवे,अनिल सौंदडे उपस्थित होते. यावेळी पोपटराव खोमणे म्हणाले की, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही.

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

2012 च्या घटना दुरुस्ती मध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशन चा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे यानुसार धर्मादाय आयुक्त यांनी सर्व विश्वस्त नेमलेले आहेत. देवस्थान साठी तब्बल 479 जणांनी अर्ज केले होते, त्यातील 95 अर्ज बाद झाले आणि जवळपास 300 पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

विश्वस्तांना त्यांच्या मुलाखतीमध्ये विविध क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सामाजिक विषयांसोबतच मंदिर व्यवस्थापन, दैनंदिन दिनचर्या, पूजा अर्चा, श्री खंडोबा दैवत याविषयी माहिती,आपत्कालीन व्यवस्थापन आणि अनेक प्रश्न विचारले.त्या सर्व प्रश्नांना विश्वस्तांनी उत्तरे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

 तसेच ते पुढे म्हणाले की, जेजुरी गडावर विविध प्रकल्प येत्या काळात राबविली जाणार आहेत. तसेच मागील पंधरा दिवसापासून ग्रामस्थांचे विश्वस्त पदावरून जे आंदोलन सुरू आहे.ते आंदोलन मागे घेण्यात यावे आणि आपण एकत्रित विकास काम करू हीच आंदोलनकर्त्यांना विनंती असल्याचे त्यांनी ( Pune ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.