Pune : आरती कोंढरे यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार 2020 प्रदान

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य आयोजित “बेटी बचाव बेटी पढाव” “स्री सन्मान गौरव पुरस्कार कार्यक्रमामध्ये “आदर्श नगरसेविका पुरस्कार 2020 आरती सचिन कोंढरे यांना डॉ. राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी विजयराव पुराणीक, स्वरदा बापट, पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, विकास रासकर (प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा), श्याम सातपुते. कार्यक्रमाचे संयोजक ईशा कोळेकर (प्रदेश सचिव) व अजय वीरकर (प्रदेश सदस्य) उपस्थित होते.

सुजन फौंडेशन-खानवडी यांच्यावतीने राज्यस्तरीय पहिला – महात्मा फुले कॉर्पोरेटर पुरस्कार 2018  प्रदान करण्यात आला. सिद्धी फौंडेशन आयोजित- सिद्धी गौरव पुरस्कार २०१८ – कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार देखील आरती कोंढरे यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर समिती पुणे यांच्या वतीने कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, माणूस परिवार पुणे, यांच्या मार्फत लोकप्रिय नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.