Pune: तुम्ही लुंगी घालून फिरताना सदनाचा अवमान होत नाही का, ब्राह्मण महासंघाचा नायडू यांना सवाल

Pune: Aren't you insulting the House while walking around in a lungi Brahmin Federation asked to venkaiah naidu सगळीकडे लुंगी घालून फिरताना यांना घर आणि सदन मधील फरक समजतो का? हे त्याला त्यांची संस्कृती म्हणणार

एमपीसी न्यूज- राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी बुधवारी शपथ घेतली. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात झाला. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली होती.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शपथविधी दरम्यानचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिवभक्त व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हटल्यानंतर ‘हे घर नाही माझे चेंबर आहे’ असे म्हणणारे नायडू जेव्हा स्वतः लुंगी घालून फिरतात तेव्हा सभागृहाचा अपमान होत नाही का असा सवाल महासंघाने उपस्थित केला आहे.

सगळीकडे लुंगी घालून फिरताना यांना घर आणि सदन मधील फरक समजतो का? हे त्याला त्यांची संस्कृती म्हणणार आणि दुसऱ्यांनी आपली संस्कृती पाळली की सदनाचा अवमान का? असा प्रश्न विचारत महाराजांचा अपमान करणारे नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यन्त उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भागच घेऊ नये असेही दवे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.