Pune : शिक्षणासाठी मुलीला घरी आणून बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज-पुण्यातील एका वसतिगृहात राहून शिक्षण (Pune) घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवणाऱ्या एका पन्नास वर्षे व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इतकेच नाही तर शरीर संबंधाचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सलग दोन वर्ष या तरुणीचे लैंगिक शोषण हा व्यक्ती करत होता. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉरेन्स फ्रॅन्सीस एंथनी (वय 50, शांताई टावर चार वाडा मांजरी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका वीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार आरोपीच्या मांजरी येथील घरात एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला.

Pune : पुणे हादरले ! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पुण्यातीलच एका शाळेत शिक्षण घेत होत्या. त्या वस्तीगृहात राहायच्या. तर आरोपी लॉरेन्स हा त्याच वसतिगृहामध्ये कामाला होता. दरम्यान आरोपीने फिर्यादी तरुणीला पिंपरी चिंचवड येथे नवीन वसतिगृह चालू करणार आहे. त्या ठिकाणी चांगल्या सुविधा असतील असे बोलून तो घरी घेऊन गेला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला घरातील कामे करण्यास भाग पाडणे. इतकेच नाही तर पत्नी आणि मुले घराबाहेर गेली असताना आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार करून आरोपीने व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर भापकर करत (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.