Pune : बनावट गुणपत्रिका बनविल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बनावट गुणपत्रिका बनविल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून संगणक, पेन ड्राईव्ह, इतर 5 बनावट सर्टिफिकेट, 2 मोबाईल जप्त केले आहेत.

नारायण रघुनाथ आंबेकर आणि नागेश भरत आंबेकर (दोघेही रा देवले, पो.मळवली, ता मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्याची नवे आहेत.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, नारायण आणि नागेश हे दोघेजण 10 वी,12 वी,डिग्री, ITI नापास विद्यार्थ्यांना पासचे बनावट गुणपत्रिका बनवून देत होते. यांची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यांनी डमी ग्राहकाला नापास गुणपत्रिका देऊन पाठवून याबाबतची खात्री करून घेतली.

यावेळी डमी ग्राहकाला पासचे सर्टिफिकेट देताना नारायण रघुनाथ आंबेकर आणि नागेश भरत आंबेकर या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून संगणक, पेन ड्राईव्ह, इतर 5 बनावट सर्टिफिकेट, 2 मोबाईल जप्त केले आहे. तसेच या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीण येथे पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे माहिती जमा केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.