Pune : पप्पू पडवळ खूनप्रकरणी तिघांना अटक, व्याजाचे पैसे देण्यावरून केला होता खून

arrested three persons in Pappu Padwal murder case ; murder on the charge of paying interest

एमपीसीन्यूज : पुण्यातील कोंढव्यात काही दिवसांपूर्वी सराईत गुंड घनश्याम उर्फ पप्पू पडवळ याचा राहत्या घरात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यास कोंढवा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. व्याजाचे पैसे आकारण्यावरून हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

लतीफ अबू शेख (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या प्रमुख संशयित आरोपीचे नाव आहे. मृत पप्पू पडवळ हा व्याज्याने पैसे द्यायचा. त्याने लतीफ शेख याला व्याजाने 49 लाख रुपये दिले होते. कर्जपोटी त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवली होती.

यावर शेख याने व्याजापोटी पडवळ याला 2 कोटी रुपये दिले होते. परंतु, आणखी 80 लाख रुपये द्यावेत यासाठी पडवळ याने खून करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेख यानेच पडवळचा खून करण्याचा कट रचला.

_MPC_DIR_MPU_II

शेख याची आई आजारी असताना एका मौलवीमार्फत तिच्यावर उपचार करण्यात आले होते. हे त्याने पप्पू पडवळ याला सांगितले होते. पडवळ यालाही काही आजार होते. त्यामुळे त्याने मौलवीला घेऊन फ्लॅटवर बोलावले होते.

हीच संधी साधून त्याने पप्पूचा खून करण्याचा कट रचला. 9 जुलै रोजी शेख सर्वप्रथम पडवळ याच्या कोथरूड येथील घरी गेला. त्यानंतर इतर दोघे आले. त्याने मौलवी म्हणून त्यांची ओळख करून दिली.

त्यानंतर पूजा करण्याच्या बहाण्याने त्यांनी पप्पूला खाली बसवले. मंत्र म्हणण्याच्या बहाण्याने त्याला डोळे बंद करण्यास सांगितले. पप्पूने डोळे बंद करताच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.

त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वजण घर बंद करून निघून गेले. 11 जुलै रोजी खून झाल्याचे उघडकीस आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1