Pune : देशांतर्गत विमानसेवेतून दोन दिवसांत पुणे विमानतळावर 1,167 प्रवाशांचे आगमन – जिल्हाधिकारी राम

Arrival of 1,167 passengers at Pune airport in two days by domestic airline - Collector Ram

एमपीसीन्यूज : 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. या पहिल्याच दिवशी 11 विमानाने 823, तर 26 मेरोजी 8 विमानाने 344, अशा एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7 करण्यात आली आहे.

पुणे विमानतळ येथे उतरणा-या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.