Pune : पुण्यातील कृत्रिम पाणीटंचाईची न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज- पाणी मीटरचे काम एका ठेकेदाराला देण्यासाठी पुण्यात कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कालवा फुटणे, त्यानंतर पाणीकपात जाहीर करणे, मीटर बसविण्याचे नियोजन सुरू होणे हा सर्व योगायोग असू शकत नाही. त्यामुळे पुण्यातील कृत्रिम पाणीकपात रद्द करून ताबडतोब या प्रकरणाची न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे माजी नगरसेवक शिवा मंत्री, नरेंद्र व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. गेल्या दोन वर्षांत 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली साधारण 30 टक्के पाणीपट्टी पुणे महापालिकेने वाढविली आहे.

एका बाजूला पाणीपट्टीत वाढ, तर दुसऱ्या बाजूला पाणीकपात केली जात आहे. ही पाणीटंचाई कृत्रिम आहे. पाणीमीटरचे काम एका ठेकेदाराला देण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. कालवा फुटणे, त्यानंतर पाणीकपात जाहीर करणे, मीटर बसविण्याचे नियोजन सुरू होणे हा सर्व योगायोग असू शकत नाही. त्यामुळे पुण्यातील कृत्रिम पाणीकपात रद्द करून ताबडतोब या प्रकरणाचा न्यायालयामाफत चौकशी करण्याचीही मागणी गाडगीळ आणि बालगुडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.