Pune : हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्यावरून रॅपलिंग करताना दरीत पडून गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोकणकड्यावरून रॅपलिंग करत असताना फॉल झाल्याने महाराष्ट्राचे नावाजलेले ट्रेकर अरूण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला. हि घटना शनिवारी सकाळी हरिश्चंद्र गड परिसरात घडली. या वृत्ताने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

हरिश्चंद्र गडाहून माकडनाळ या राॅकवर चढाई करण्यासाठी तीस जणांचे युनिटसह शनिवारी सकाळपासून क्लाई्बिंग करत होते. अरूण सावंत लीड करत होते. कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात असताना फाॅल झाला. अन् सुमारे ५५० फूट खोल दरीत खडकांवर सावंत पडले, त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला आहे.

महाराष्ट्रातला सर्वात जुना अनुभवी ट्रेकर म्हणून परिचित होते. ड्युक्स नोज लोणावळाची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक, सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ट्रेकिंगच्या जागा सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वाॅटरफाॅल रॅपलिंग सारख्या जागा शोधणारा अवलिया गिर्यारोहक होते.

गेली 40 वर्ष सह्याद्रीमध्ये प्रचंड भटकंती केलेला गिर्यारोहक. त्यांनी अनेक वाटा शोधल्या. अनेक कड्यांवर आजही अरूण सावंत यांनी केलेल्या बोल्टींगच्या आधारावरच गिर्यारोहक चढाई केली जात आहे. अरूण सावंत यांच्या जाण्याने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.