Pune : भाजपच्या कार्यकारिणीत तब्बल 12 उपाध्यक्ष, काकडे गटाला मानाचे स्थान

As many as 12 vice-presidents in the BJP executive, Kakade group has a place in the mind

एमपीसी न्यूज – मागील काही महिन्यांपासून रखडलेली  भारतीय जनता पार्टीची जम्बो पुणे शहर कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली.यामध्ये  तब्बल 12 जणांची उपाध्यक्ष पदावर   निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या गटाला मानाचे स्थान देण्यात आले आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकी पासून काकडे गटाला स्थान मिळत नसल्याची ओरड सुरू होती.

याबाबतची  घोषणा पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज केली आहे. या सर्वांना निवडीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

नगरसेवक हरिदास चरवड, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, नगरसेविका मानसी देशपांडे, भूषण तुपे, संतोष राजगुरू, योगेश बाचल, गणेश कळमकर, सुनील मारणे, श्रीपाद ढेकणे, दिलीप काळोखे, डॉ. संदीप बुटाला, रमेश काळे यांची  उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राजेश पांडे यांची सरचिटणीस-संघटन,  तर  गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे यांची सरचिटणीसपदी, नगरसेविका गायत्री खडके, प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, मंगला ढोरे, कोमल शेंडकर, हरीश निकम, संदीप लोणकर, अनिता तलाठी, सुनील माने, निलेश कोंढाळकर यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.