Pune : कोरोनाचे आज तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे, केवळ 57 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

As many as 168 patients of Corona were cured today in Pune city, only 57 new patients, 6 deaths. पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 259 असून, आजपर्यंत 3 हजार 950 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी असून रोज सातत्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढत असताना सोमवारी तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात केवळ 57 नव्या रुग्णांची नोंद होऊन 6 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला.

क्रिटिकल रुग्ण असून, 46 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात आता कोरोनाचे 6 हजार 529 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 320 जणांचा मृत्यू झाला आहे.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, किडनी, हृदयाचा विकार, लठ्ठपणा, असे अनेक आजार होते. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

मार्केटयार्ड भागातील 74 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 76 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 58 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 75 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 60 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 74 वर्षीय महिलेचा सिम्बयोसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 259 असून, आजपर्यंत 3 हजार 950 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आज कोरोनाचा 1 हजार 597 चाचण्या करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.