Pune: तब्बल 28 लाख लिटर पाण्याचे होणार शुद्धीकरण – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज – वारजे तपोधाम परिसरात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प(Pune) उभारण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे  यांच्यासोबत या उपक्रमासाठी  वेळोवेळी पाठपुरावा केला असून या उपक्रमाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खासदार सुळे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.
आणि योग्य त्या सूचना दिल्या. तपोधाम परिसरातील तब्बल 5 ते 6 एकर जागेतील या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रतिदिन तब्बल 28 लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण होणार असून यामुळे होणारे पाणी प्रदूषण नियंत्रित होईल, यात शंकाच नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने यांनी दिली.

Pimpri : बकुळगंध’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

आपण ज्या निसर्गात वास्तव्य करतो, त्या निसर्गात राहत असताना निसर्गाप्रती कृतज्ञता ठेवून पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक असते. हे सांडपाणी नदीत मिसळल्याने नदीचे प्रदूषण होऊन जलपर्णीचा विळखा घट्ट होत आहे. यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.
याच धर्तीवर या प्रकल्पाचे महत्व अधोरेखित होत असून हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, यात शंकाच नाही. यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निवारीत होणार असून नदीची मरणासन्न असणारी अवस्था सुधारण्यास साहाय्य होईल, असा विश्वास वाटतो, असेही स्वप्नील दुधाने यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, काका चव्हाण उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.