Pune: मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6,799 जणांकडून 20 लाख 47 हजारांचा दंड वसूल

Pune: As many as 6,799 people who did not wear masks were fined Rs 20 lakh 47 thousand पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कडक उपायोजना केली आहे. मास्क न वापरणाऱ्या तब्बल 6 हजार 799 बेफिकीर नागरिकांकडून 20 लाख 47 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत 20 लाख 47 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

तालुकानिहाय केलेली कारवाई (आकारलेल्या दंडाची रक्कम)

आंबेगाव – 395 (1 लाख 95 हजार 500)
बारामती – 573 (1 लाख 46 हजार 800)
भोर – 102 (51 हजार)
दौंड – 874 (2 लाख 36 हजार)
हवेली – 1782 (2 लाख 11 हजार 500)
इंदापूर – 899 (2 लाख 76 हजार 600)
जुन्नर – 456 (91 हजार 200)
खेड – 110 (55 हजार)
मावळ – 123 (61 हजार 500)
मुळशी – 540 (2 लाख 70 हजार)
पुरंदर – 381 (1 लाख 69 हजार)
शिरूर – 435 (2 लाख 17 हजार 50)
वेल्हे – 132 (66 हजार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.