BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मला तर वाटतंय हायवेवर हेल्मेट सक्ती असावी – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील जे दुचाकीचालक ट्रिपल सीट, बेभानपणे वाहने चालवितात, ड्रिंक करून चालविणे, अशांवर वाहतुक पोलिसानी कारवाई करावी. पण, सध्या शहरातील अनेक चौकातील पोलिस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती असावी, अशी भूमिका पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी मांडली. पुणे शहरातील प्रत्येक चौकात वाहतुक पोलीस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई केली जात आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

पुणे शहरात वाहतुक पोलीसांकडून 1 जानेवारीपासून जे दुचाकीचालक विना हेल्मेट वाहन चालविताना आढळत आहेत. अशांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. या कारवाईला शहरातील अनेक संघटनांनी विरोध देखील दर्शविला होता. हेल्मेट कारवाई रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात चांगलेच राजकारण तापले होते.

  • तर, या निवडणुकीत पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हेल्मेट कारवाईबाबत पुणे शहरातील जे दुचाकीचालक ट्रिपल सीट, बेभानपणे वाहने चालविणे आणि ड्रिंक करून चालविणे. अशांवर वाहतुक पोलिसानी कारवाई करावी. पण, सध्या शहरातील अनेक चौकातील पोलिस विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती असावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रश्नावर पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3