Pune : ‘सीप’च्या अध्यक्षपदी अश्विन मेघा यांची निवड

एमपीसी न्यूज- पुण्यातील ‘सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ अर्थात ‘सीप’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी अश्विन मेघा यांची सीपचे अध्यक्ष म्हणून तर विद्याधर पुरंदरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

त्याचप्रमाणे स्वप्नील देशपांडे (सचिव), आनंद रानडे (खजिनदार) तर कार्यकारी समितीच्या सदस्यपदी समीर सोमण, एस. रामप्रसाद, अभिजित अत्रे, नितीन देशपांडे, पराग बर्वे, प्रशांत के. एस,  आशुतोष पारसनीस, राधिका थरूर यांची देखील निवड जाहीर करण्यात आली. मर्क्युरी इंडिया या सेल्स परफॉर्मन्स कन्सल्टंट संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रवी सुब्रम्हण्यम आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यावेळी उपस्थित होते.

सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणेची स्थापना ही १९९८ साली झाली असून गेल्या २१ वर्षांपासून संस्था कार्यरत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणे शहरात नाविन्यपूर्ण उद्योगांची निर्मिती करीत एक प्रकारची इकोसिस्टीम विकसित करणे, शहराला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे केंद्र बनविणे यासाठी सीप प्रयत्नशील आहे. याबरोबरच डिजिटल जगामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या ‘स्टार्टअपस्’ना प्रोत्साहन व पाठिंबा देण्याबरोबरच त्यांच्यासाठी शहरात अनुकूल परिस्थिती निर्माण करीत त्यांच्या वाढीसाठी देखील संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असतात.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.