BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अस्पात, रोव्हर्स अंतिम फेरीत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – येथे सुरू असलेल्या मार ओस्थाथिओस निमंत्रित हॉकी स्पर्धेत प्रभाकर अस्पात आणि रोव्हर्स अकादमी संघांत अंतिम झुंज रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात अस्पात अकादमीने विक्रम पिल्ले अकादमी संघाचा 6-4, तर रोव्हर्स अकादमी संघाने एक्‍सलन्सी अकादमी संघाचा 3-1 असा पराभव केला.

मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत राहुल आणि आदित्य रसाळ बंधूंनी नोंदविलेल्या गोलने रोव्हर्सचा विजय सुकर झाला. राहुलने दोन, तर आदित्यने एक गोल केला. एक्‍सलन्सी संघाकडून एकमात्र गोल सौरभ पाटिलने केला.

  • अस्पात आणि विक्रम पिल्ले अकादमी हा उपांत्य फेरीचा सामना कमालीचा वेगवान झाला. या सामन्यात तब्बल दहा गोलची नोंद झाली. पण, बाजी अस्पात अकादमीने मारली. पहिल्या मिनिटाला महंमद सादिकने गोल नोंदवून अस्पात अकादमी संघाचे मनसुबे स्पष्ट केले. त्यानंतर वेंकटेश केंच आणि तालेब शाह यांनी चार मिनिटांत दोन गोल करून पिल्ले अकादमी संघाला आघाडीवर नेले. मात्र, सामन्याच्या 23व्या मिनिटाला कुणाल जगदाळे याने गोल करून अस्पात संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतराला सामना 2-2 असा बरोबरीत होता.

उत्तरार्धात अरविंद यादवने 35 आणि 50व्या मिनिटाला, तर गणेश गिरीगोसावी याने 37व्या, महंमद सादिकने 44व्या मिनिटाला गोल करून अस्पात संघाची आघाडी भक्कम केली. अस्पातचे उत्तरार्धातील आक्रमण रोखताना विक्रम पिल्ले संघाच्या खेळाडूंची दमछाक झाली. त्यांच्याकडून केंटने 55 आणि राहुल शिंदे याने 47व्या मिनिटाला गोल करून चांगले प्रयत्न केले. पण, त्यांना अस्पात संघाला गाठणे शक्‍य झाले नाही.

  • स्पर्धेचा अंतिम सामना उद्या शनिवारी (दि. १३) सकाळी 10 वाजता खेळविण्यात येईल.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.