Pune : कसबा मतदारसंघात महापौर विरुद्ध काँग्रेस गटनेते सामना रंगणार

रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणारे महापौर मुक्ता टिळक आणि काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे आता कसबा विधानसभा मतदारसंघात समोरासमोर उभे ठाकले आहेत. या लढतीमध्ये अपक्ष आणि काँगेस पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासून हा मतदारसंघ पिंजून काढला होता. बापट यांना विजय मिळविताना धंगेकर यांनी घाम फोडला होता. त्यामुळे काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या उमेदवारीमुळे धंगेकर यांचावर अन्याय झाल्याची चर्चा सुरू आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात माजी आमदार दीप्ती चौधरी, मनीष आनंद प्रबळ इच्छुक होते. त्यांचा ऐवजी माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बहिरट विरुद्ध सिद्धार्थ शिरोळे अशी थेट लढत होणार आहे. मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.