Pune : फळे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू पुराविण्यासाठी प्रशासनाकडून सोय

एमपीसी न्यूज – नागरिकांना फळे, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. ‘कोरोना’चे संक्रमण होऊ नये, म्हणून दिवसरात्र घरात थांबलेले नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यावेळी संबंधित ठिकाणी गर्दी असल्यास त्याचा धोका संभावू शकतो. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग, नगरपालिका, आणि शेतकऱ्यांच्या विविध गटांनी फळे व भाजीपाला विक्रीची सोय केली आहे.

केंद्र शासनाने पुढील 21 दिवस संचारबंदी लागू केली आहे. परिणामतः ग्राहकांना फळे व भाजीपाला या जीवनावश्यक गोष्टी खरेदी करता अडचण येत आहे. तसेच शेतकऱ्यांना तयार झालेला फळे व भाजीपाला बाजारपेठेमध्ये विक्री करण्याकरिता सुद्धा अडचणी येत आहे.

या दोन्ही बाबींचा विचार करून मध्यममार्ग काढण्यात आला आहे. विविध शेतकरी गट ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत फळे आणि भाजीपाला पोहोचविण्यासाठी मदत करणार आहेत. त्यासाठी नागरिकांना संबंधित गटांच्या व्हाट्सअप अथवा मोबाईल फोनवर संपर्क करावा लागणार आहे.

आपली मागणी नोंदविल्यानंतर संबंधित फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या गटाचे प्रतिनिधी ग्राहकांच्या सोसायटी अथवा घरांच्या बाहेर फळे व भाजीपाला पोहोचवतील.

शेतकरी गटांशी संपर्क साधा –
# संजीवणी डाळिंब व भाजीपाला उत्पादक गट विरगाव ता. अकोले
संपर्क – गणेश तोरकड +91 96732 55062/+91 75885 14986

# दुधेश्वर फार्मर्स प्रोडूसर कंपनी निमगावजाळी ता. संगमनेर
संपर्क- किरण अरगडे 9921255551

# आदर्श फार्मर प्रोडूसर कंपनी, पिंपरीलौकी अजमपूर
संपर्क – दिलीप लावरे 8275279867

# सह्याद्री सेंद्रिय शेतकरी गट ता. सायखिंडी, ता. संगमनेर
संपर्क- गंगाधर चारूंडे 75886 06165

# म्हाळुंगी आदिवासी परिसर आदिवासी शेतकरी गट म्हाळुंगी, ता. अकोले
संपर्क- युवराज डामसे 96576 95209 / 76201 27069
निलेश दिक्षित 90498 98429

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.