Pune : हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनकडून 50 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज – हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या (एचआयए) वतीने प्रशासनाला 50 लाख रूपयांचा सहायता निधी देण्यात आला. कोरोना विरोधात लढण्यासाठी ही मदत केल्याचे एचआयए कडून सांगण्यात आले.

एचआयएचे कर्नल सालणकर यांनी विभागीय आयुक्त  कार्यालयात जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे मदतीचा  धनादेश सुपूर्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदि उपस्थित होते.

यामध्ये 20 लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, 20 लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19, आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्यकडे पाच लाख रूपयांचे 850  धान्याचे  किट देण्यात आले.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. सर्व स्तरातून मदत केली जात आहे. प्रशासनाकडून देखील खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थचक्राला खीळ बसली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यातूनच ही मदत केल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.