Pune : कोरोनाबाधीत सहायक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहर पोलीस दलातील सहायक फौजदार दिलीप पोपट लोंढे ( वय 57) यांचा कोरोनामुळे आज ( सोमवारी) भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ते फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

‘एनएनआय’ ने ही माहिती दिली आहे. लोंढे हे लॉकडाऊनमध्ये पोलीस बंदोबस्तावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लोंढे यांना १२ दिवसांपासून व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज ( सोमवारी) उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाला. त्यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली. कोरोनामुळे पुण्यात झालेला पोलीस दलातील हा पहिला मृत्यू आहे.

लोंढे यांना उच्च रक्तदाब आणि स्थूलपणाचा आजार होता, अशी माहिती भारती रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.