Pune : पंधरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी एका सहायक पोलीस उपनिरीक्षकास अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – प्रोहीबेशन अ‍ॅक्टप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करून जामीनास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजाराची लाच मागितली. यातील सुमारे पंधरा हजाराची लाच पुणे ग्रामीणमधील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकास घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सुधाकर दगडू कोळेकर (वय 57, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत तक्रारदार यांनी रीतसर तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून गुरुवारी (दि. 12) तक्रारीची पडताळणी केली असता सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कोळेकर याने तक्रारदार यांच्याकडे सुमारे पंधरा हजाराची लाच स्वीकारली. प्रोहीबेशन अ‍ॅक्टप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करून जामीनास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार याला अटक करून दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन करण्यासाठी लाच मागितली.

यातील कोळेकर याने तडजोडीअंती पंधरा हजार रुपये घेतले. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'876b8f663a1761fe',t:'MTcxMzUxNTcxNy45NTkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();