BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सहाय्यक प्राध्यापिका भूपाली शहा यांना पीएच.डी. प्रदान

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथील सहाय्यक प्रा. भूपाली शहा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्या वाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्रदान केली आहे.

ही पदवी डॉ. डी.डी. बाळसराफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “स्टडी ऑफ आंत्रेप्रेनुरीयल कल्चर अ‍ॅण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन बिझनेस डेव्हलपमेंट प्रोसेस इन एस.एस.आय. युनिट्स” या विषयावर संशोधन केले.कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा, महाविद्यालयाचे डॉ. सचिन बोरगावे, डॉ. जे.डी.टाकळकर, डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. राजेंद्र कांकरीया, डॉ. पोर्णिमा कदम, डॉ. वनिता कुर्‍हाडे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3