Pune: कुलगुरू नितीन कळमळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील जेवणात वारंवार अळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी कुलगुरू नितीन कळमळकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयात तक्रार दिली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधांत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानवये गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.