Pune Crime : पुण्याच्या धनकवडीत खुनी होळी; आमच्या एरियात काय करतोस म्हणत एकावर प्राणघात हल्ला

एमपीसी न्यूज : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्यास आलेल्या तिघांना टोळक्याने आमच्या भागात काय करतो म्हणत टोळक्याने जीवे घेणा हल्ला केला. (Pune Crime) त्यांच्या डोक्यात फरशीने मारहाण करून व धारधार हत्याराने वार करण्यात आले. हल्यात दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. धनकवडीत हा प्रकार रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. 

 

याप्रकरणी अक्षय शांतीनाथ दिवाणे (वय 24, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. यानूसार, 8 ते 9 जणांच्या टोळक्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune News : आढाव दांपत्य आजच्या काळातील सावित्री-ज्योतिबा- डॉ. सदानंद मोरे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दिवाणे हा त्याच्या मित्रांसोबत धनकवडीत रंगपंचमी खेळण्यासाठी आला होता. त्याचे मित्र जय पवार व ओम पवार रंगपंचमी खेळत होते.(Pune Crime) यादरम्यान, टोळके आले. त्यांनी तक्रारदार तरुणाला “तु कुठे राहतो. आमच्या भागात काय करतो”, असे म्हणत वाद घातला.  शिवीगाळ करत जय पवार याच्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. दरम्यान, हे वाद सोडविण्यासाठी अक्षय तसेच जय पवार हे दोघे आले असता त्यांच्यावर हत्याराने व फरशीने डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.