Pune : जुन्या वादातून तरुणावर हल्ला, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील संतोषनगर (Pune) येथे जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

रोहन सिमा शेख उर्फ रेहान दिनेश शेख (वय 19 रा. कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच दोन विधी संघर्षीत बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक करीता थांबले असताना आरोपीने मोटार सायकलवरून येवून शस्त्राने वार करत जखमी केले (Pune) होते. फिर्यादी व आरोपी हे यांच्या जुना वाद झाला होता. त्याच रागातून आरोपीने फिर्यादीवर हल्ला केला होता.

Talegaon Dabhade : हिंद विजय सहकार पुरस्काराने दोन पतसंस्थांचा गौरव

यातील आणखी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.