Pune – एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज – वयस्कर नागरिकांना हेरून एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम मधून हातचलाखीने पैसे काढून लोकांची फसवणुक करणा-यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

अय्याज कासम शेख (वय 33, रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्याज शेख हा एटीएम च्या बाहेर उभा राहत असत. आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर लोकांना हेरून तो एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीच आला आहे असे दाखवत. दरम्यान ज्या लोकांना एटीएममधून पैसे काढण्याची माहिती नाही त्यांना ‘ मी तुम्हाला पैसे काढून देतो ‘ असे बोलून विश्वासात घेत. त्यानंतर तो एटीएमचा वापर करून लोकांना हे एटीएम मशीन खराब आहे किंवा एटीएम मध्ये पैसे नाहीत असे बोलून दूस-या एटीएममधून पैसे काढा असे सांगून  लोकांना माघारी पाठवत. अशाप्रकारे तो लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची फसवणुक करत.

गस्त घालत असताना पोलिस नाईक किरण घुटे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून लोकांची फसवणुक करणा-या अय्याज विषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अय्याजला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अशाप्रकारे अनेक लोकांची फसवणुक केल्याचे कबूल केले. याप्रकरणी पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहीते, पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे, पोलीस कर्मचारी किरण घुटे, संदीप गायकवाड, सुरेश गेंजगे, ठोकळ अण्णा, गणेश लोखंडे, राजकिरण पवार, विशाल मेमाणे, अनिरूद्ध सोनवणे, हेमंत माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.