Pune : लेखापरीक्षण व ऑडीट मानांकने विषयक प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- डाॅ. विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान (आयसीएम) संस्थेतर्फे प्रमाणीत लेखापरीक्षकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील डाॅ. विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर ,सातारा जिल्ह्यातील येथील लेखापरीक्षक हजर होते.

आयसीएम पुणे च्या प्रकल्प समन्वयक व्ही.एम.भगवती व महाराष्ट्र राज्य ऑडीटर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के उपस्थित होते. यावेळी लेखापरीक्षकाना मार्गदर्शन करण्यात आले. लेखापरीक्षणाची व ऑडीटची मानांकने याचे प्रशिक्षण सातारा जिल्हा ऑडीटर असोसिएशनचे अध्यक्ष, लेखक बाळकृष्ण जाधव यांनी केले. त्यांनी हे कठीण विषय परिणामकारक रितीने व ओघवत्या भाषेत सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.