Pune auto drivers: पुण्यात रिक्षाचालकांची मनमानी! मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार!

एमपीसी न्यूज: रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (RTA) प्रलंबित असताना, इंधन दरवाढीमुळे परवडत नसल्याची सबब पुढे करीत पुण्यातील अनेक रिक्षाचालक (Pune auto drivers) मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देत आहेत. रिक्षाचालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेआकारणीमुळे प्रवासी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय 25 जुलै रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेच्या बैठकीत घेण्यात आला होता. पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या 21 रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर 23 रूपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे 14 रूपयावरून 15 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.(Pune auto drivers) मात्र भाडेदरवाढीचा पुर्नविचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटना व प्रवासी संघटनांनी मागणी केली आहे. या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी ऑटो रिक्षा भाडे दरवाढ प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक रिक्षाचालकांनी मात्र प्रवाशांकडून मीटरऐवजी मनमानी भाडेआकारणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारण्याबाबत प्रवाशांनी आग्रह धरला तर अनेक रिक्षाचालक थेट नकार देत आहेत. हाच अनुभव वारंवार येत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

सध्याच्या मीटरप्रमाणे 40 रुपये भाडे होत असेल तर त्या ठिकाणी 70 ते 80 रुपयांपर्यंत भाडे हे रिक्षाचालक मागत आहेत. ही प्रवाशांची लूट असल्याची प्रतिक्रिया श्यामकांत शिंदे या प्रवाशाने दिली.(Pune auto drivers) सोमवारी रात्री पावणेआठ ते आठच्या दरम्यान पुणे वेधशाळा (सिमला ऑफिस) ते मॉडेल कॉलनी कॉर्नर या पट्ट्यात आठ रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार दिल्याचा अनुभव सुलक्षणा देशपांडे या ज्येष्ठ महिलेने सांगितला.

 

इंधनाचे दर वाढले म्हणून परस्पर मनमानी भाडेआकारणी करणे ही रिक्षाचालकांची मुजोरी आहे. भाडेवाढीबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत जुन्या दरानेच मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस तसेच आरटीओने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत तावडे या प्रवाशाने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केली.

Spartan Monsoon League : इलेव्हन स्टॅलियन क्लब, एकदंत क्रिकेट क्लब, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब संघांचा पहिला विजय

अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे म्हणाले की, “अजून रिक्षांसाठी ची प्रस्तावित भाडेवाढ मंजूर झाली नाही. जुन्या दरानेच मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे.(Pune auto drivers) जर कोणताही रिक्षा चालक जुन्या दरानेच मीटर प्रमाणे भाडे घेत नसेल व मनमानी भाडे मागत असेल तर त्याच्याबद्दल आरटीओ ऑफिस कडे तक्रार करावी. अशा तक्रारींवर आरटीओ ऑफिस मार्फत योग्य ती कारवाई केली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.